‘माय वोट, माय राइट’ सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद….

Share

एसएमएस – प्रतिनिधी -सोमा बाबू डे.

मुंबई :‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी द बॉम्बे कॅथोलिक सभा, ऑर्लेम युनिटतर्फे “माय वोट, माय राइट – हाऊ डू आय सिक्युअर माय वोट” या घोषवाक्याखाली मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. सुमारे १०० नागरिकांनी या सत्राला उपस्थिती दर्शवली.

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चॉकलिंगम यांच्या अधिकृत अधिसूचनेची प्रतीक्षा सुरू असताना, मतदार नोंदणी प्रक्रियेची प्राथमिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता. सत्रात मतदार नोंदणीतील टप्पे, विविध अर्ज, आवश्यक कागदपत्रे तसेच बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्या घरभेटींची माहिती देण्यात आली.

यावेळी २००२ च्या मतदार यादीत स्वतःचे किंवा कुटुंबीयांचे नाव शोधणे, एन्युमरेशन फॉर्म भरून तयार ठेवणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, मसुदा मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव तपासणे आदी बाबींवर विशेष भर देण्यात आला. तसेच तरुणांनी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन प्रक्रियेत मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.

हे संवादात्मक सत्र सभेचे अध्यक्ष नॉर्बर्ट मेंडोन्सा आणि प्रवक्ते डॉल्फी डिसोझा यांनी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे मार्गदर्शित केले. कार्यक्रमास ऑर्लेम येथील अवर लेडी ऑफ लूर्ड्स चर्चचे पॅरिश प्रीस्ट फादर अ‍ॅनिसेटो परेरा व सहाय्यक पॅरिश प्रीस्ट फादर रॉनी वाझ उपस्थित होते.

दरम्यान, एसआयआर  प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर नागरिकांना मार्गदर्शनासाठी विविध ठिकाणी हेल्प डेस्क उभारण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.


Share

2 thoughts on “‘माय वोट, माय राइट’ सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *