
एसएमएस -प्रतिनिधी – सुरेश बोर्ले
मुंबई : गोरेगाव येथील नेस्को मैदानावर आयोजित एका इव्हेंटदरम्यान अमली पदार्थांच्या अति सेवनामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत काही अन्य तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री नेस्को मैदानावर आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने तरुणाई सहभागी झाली होती. संगीताच्या तालावर रंगलेल्या या कार्यक्रमादरम्यान काही जणांनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कार्यक्रम संपल्यानंतरही काही तरुण वाहनांमधील स्पीकर्सवर मोठ्या आवाजात संगीत लावून थांबले होते. याचवेळी अमली पदार्थांच्या अति सेवनामुळे काही जण बेशुद्ध पडले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
मृत आणि जखमी सर्वजण एमबीएचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे अमली पदार्थ कार्यक्रमस्थळी कसे पोहोचले, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे, परिसरात वनराई पोलीस ठाणे जवळ असून कार्यक्रमासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता.
या प्रकरणी पोलिसांनी कार्यक्रम आयोजक, नेस्को व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्ती आणि इतर सहा जणांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून नेस्को प्रशासनाकडून पोलिसांना सहकार्य केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
Very bad
Tarunayi kuthe challi ahe??