“शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या जाहीर वाचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई : गोविंद पानसरे लिखित या पुस्तकातील निवडक उताऱ्यांचं वाचन नीरजा, संतोष कोल्हे, अक्षय शिंपी, मुकुंद कुळे आणि युवराज मोहिते यांनी प्रभावीपणे सादर केलं.
या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रस्त्यावरून जाणारे अनेकजण थांबून हे वाचन ऐकत होते, ज्यामुळे परिसरात एक वेगळंच बौद्धिक वातावरण निर्माण झालं.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित हे पुस्तक समाजात समता, न्याय आणि सर्वधर्मसमभाव यांचा संदेश देतं, आणि त्याच भूमिकेची झलक या जाहीर वाचनातून पाहायला मिळाली.
संजय गायकवाड यांच्या वक्तव्यांना उत्तर देताना आयोजकांनी स्पष्ट संदेश दिला —“गुंडगिरीला उत्तर म्हणजे विचार आणि वाचन!”


Share

2 thoughts on ““शिवाजी कोण होता?” या पुस्तकाच्या जाहीर वाचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *