
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई :हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ लिबर्टी गार्डन, मातोश्री रमाबाई मार्ग, चाचा नेहरू गार्डन, मालाड पश्चिम येथे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी ५० वृक्षांचे रोपण माजी शाखाप्रमुख संजय सोनवणे व माजी शाखाप्रमुख अनिल म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी संजय सोनवणे यांनी पुढील काळात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत नोटबुक वाटप, तसेच अपंग व गरजू लोकांना स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून देण्याचे कार्य हाती घेतल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर उल्हास पटेल, अजित रेवाळे, जिजो वरगिस, हितु पटेल, कुंदन पटेल, सागर कांबळे, किरण शेळगे, भारत कांबळे, निरज गोहिल, गणेश पाटील, अनिस मिश्रा, नितीन जाधव, सुशांत गमरे, रविंद्र हिरेमठ, कृष्णा वाघमारे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.