मालवणीत रस्त्यावरील चेंबर खचले; दुर्घटनेची भीती…

Share

एसएमएस -प्रतिनिधी-सोमा डे.

मुंबई : मालाड पश्चिम येथील मार्वे रोड, भूमीपार्क रस्त्याच्या नाक्यावरील पाण्याचे चेंबर खचल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी या ठिकाणी पालिकेच्या कंत्राटदारामार्फत जलजोडणीच्या व्हॉल्व्हसाठी चेंबर बांधण्यात आले होते. मात्र अवजड वाहनांसह सततची वाहतूक झाल्याने हे चेंबर हळूहळू खचत गेले असून सध्या ते धोकादायक स्थितीत आहे.

दुर्घटना टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड लावले असून वाहनचालकांना सूचना दिल्या जात आहेत.

दरम्यान, याच मार्गावर पुढे असलेले आणखी एक चेंबरही खचण्याच्या स्थितीत असून त्याच्या बाजूला मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पालिकेच्या जल विभाग आणि रस्ते विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


Share

One thought on “मालवणीत रस्त्यावरील चेंबर खचले; दुर्घटनेची भीती…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *