
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
ठाणे : चितळसर पोलिस ठाणे हद्दीत दिनांक 24 रोजीमध्य रात्री 23.15 वाजे सुमारास श्रेणी पोउनि किसन भोईर व स्टाफ हे सुभाषनगर , पोखरण रोड क्र.2 या ठिकाणी CRM मोबाईल मधून गस्त करीत असताना एका पान स्टॉल जवळ गर्दी दिसून आल्याने श्रेणी पोउनि किसन भोईर हे वाहनातून उतरून पान स्टॉल चालकास विहित वेळेत बंद करण्याबाबत समज देत असताना एक इसम गोंधळ करीत असल्याचे दिसून आले. सदरहू इसमास शांतता राखण्याची समज दिली असता तो पोलिसांसोबत हुज्जत घालू लागला व सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करू लागला. म्हणून त्यास पोलिस वाहनात बसविले असता नमूद इसम हा अधिक आक्रमक झाला व तो श्रेणी पोउनि किसन भोईर यांना धक्का बुक्की करू लागला. त्याच वेळी त्याने श्रेणी पोउनि किसन भोईर यांच्या तोंडावर ठोसा मारून व धक्का मारून वाहनातून उडी मारून बाजूला उभी असलेल्या पांढऱ्या बस मागे पळून गेला. श्रेणी पोउनि किसन भोईर हे देखील लाठी घेऊन गाडीच्या खाली उतरून त्याच्या मागे धावले. त्यावेळी देखील सदरहू इसमाने श्रेणी पोउनि किसन भोईर यांच्या डोक्यात सिमेंट वीट मारली. त्यावेळी श्रेणी पोउनि किसन भोईर हे रस्तावर जोरात पडले. त्यावेळी पोलिस नाईक गंगाधर घुटे हे श्रेणी पोउनि किसन भोईर यांच्या मागे धावत गेले असता त्यांना आरोपी इसमाने श्रेणी पोउनि किसन भोईर यांना सिमेंट वीट ने डोक्यात मारून ते जमिनीवर पडलेले दिसून आले. त्यावेळी त्यांनी आजूबाजूला पाहिले असता पो ह निलेश पवार व पो शिपाई भोसले हे बाजूच्या गल्लीत आरोपीच्या मागे पळत जाताना दिसले. म्हणून पो. ना. घुटे यांनी नागरिकांच्या मदतीने श्रेणी पोउनि किसन भोईर यांना रिक्षात टाकून टायटन हॉस्पिटल येथे पाठविले व रिक्षाच्या मागे CRM मोबाईल घेऊन गेले.
टायटन हॉस्पिटल येथे श्रेणी पोउनि किसन भोईर यांना डॉक्टरांनी तपासले असता दाखलपूर्व मयत घोषित केले.
गु. र.क्र . 307/26 कलम 103(1), 132,121(1)(2), 115(2) 351(2) भा.न्या.संहिता प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.
नमूद गुन्ह्यातील आरोपी राजू वाल्मिकी वय ३० वर्ष यास अटक करण्यात आली आहे.गुन्हाचा पुढील तपास चालू आहे.