सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांचे निधन..!!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : मालाड पूर्व, आनंदवाडी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सतीश तुकाराम पवार (५७) यांचे ३ ऑक्टोबर  रोजी हृदयविकाराच्या झटक्यानेमालाड पूर्वेतील घरात  निधन झाले. मालाड पूर्व-कुरार परिसरात ‘डॅनी’ या नावाने ते परिचित होते.

पवार हे बौद्धजन पंचायत समिती, शाखा क्र. ४२३चे सक्रिय सभासद होते. तसेच मालाड पूर्वेतील खासगी कम्पनीत  कॅटरिंगमध्ये व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत होते. मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा सामाजिक आणि विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग होता.

“सतीश पवार यांच्या निधनाने शाखा क्र. ४२३चे भरून न येणारे नुकसान झाले आहे,” अशी भावना  यांनी व्यक्त केली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, मालाड समता संवर्धन समितीसह विविध संस्था-संघटनांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

पवार यांचे मूळ गाव मार्ग ताम्हाणे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी हे आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अंजली, मुलगा अथर्व असा परिवार आहे. त्यांचा जलदान व पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार, ११ ऑक्टोबर रोजी आनंदवाडी येथील राहत्या घरी होणार आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *