एसएमएस -प्रतिनिधि-उत्कर्ष बोरले.
मुंबई :महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाच्या निवडीसाठी रविवारी (ता. ११) जोगेश्वरी (पश्चिम) येथे निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सावित्रीबाई फुले बॉटनिकल गार्डन, हिल पार्क येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरातून महाराष्ट्रातील अस्थिव्यंग दिव्यांग क्रिकेटपटूंची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना नोव्हेंबरमध्ये मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
या निवड चाचणीत महाराष्ट्रातील जास्तीत जास्त दिव्यांग क्रिकेटपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय व्हीलचेअर क्रिकेटचे अध्यक्ष डॉ. भगवान तलवारे यांनी केले आहे.
अधिक माहिती व नोंदणीसाठी रमेश सरतापे (८८५०३९८५३३), शाहिद अन्सारी (७९७७९८७४१७) किंवा सुभाष सज्जन (९७६६०१०८४७) यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.