महिलांसाठी एसटी सवलतीचे कार्ड आता १ जानेवारी २०२७ पासून अनिवार्य.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -दिनेश गोसावी


ग्रामीण भागातील महिलांना दिलासा; ३१ डिसेंबरपर्यंत विनाकार्ड सवलतीचा लाभ घेता येणार


मुंबई, दि. ६ : एसटी बस प्रवासात महिलांना मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने पुढे ढकलला आहे. आता हे कार्ड १ जानेवारी २०२७ पासून अनिवार्य होणार असून, ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत कार्ड नसतानाही महिलांना पूर्वीप्रमाणे प्रवास सवलतीचा लाभ घेता येणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्र्यांकडून आलेल्या सूचना व विनंत्यांचा विचार करून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. मुदतवाढीमुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत कार्ड पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येईल. ३१ डिसेंबरपर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची शंभर टक्के नोंदणी करून कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.
मुदतवाढीचा लाभ घेऊन महिलांनी या कालावधीत एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.


Share

One thought on “महिलांसाठी एसटी सवलतीचे कार्ड आता १ जानेवारी २०२७ पासून अनिवार्य.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *