
एसएमएस -विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे पश्चिम येथील लुईसवाडी परिसरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोर पोलीस एस्कॉर्ट वाहनाला अचानक आग लागल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यासमोरील परिसरात पोलीस बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एस्कॉर्ट वाहनाने अचानक पेट घेतला. वाहनाला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेनंतर पुढील माहितीची प्रतीक्षा असून, आग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना तसेच वाहनाच्या नुकसानीबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.
(अधिक माहिती प्रतीक्षेत.)
Shocking