
एसएमएस -प्रतिनिधी -शिला पटेल
मुंबई : : मानखुर्द येथील मंडाळा परिसरात युसूफ हॉटेलजवळ असलेल्या भंगाराच्या दुकानाला शनिवारी पहाटे ३.३२ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.
अग्निशमन दलाने पहाटे ३.३४ वाजता या घटनेला ‘लेव्हल-१’ (किरकोळ स्वरूपाची आग) घोषित केले. भंगाराच्या दुकानातील साहित्यापुरती आग मर्यादित असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका आणि संबंधित विभागाचे कर्मचारी दाखल झाले.
पहाटे ३.३६ वाजता घटनेची अद्ययावत माहिती नोंदविण्यात आली. या आगीत कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त अद्याप मिळालेले नाही. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील समजू शकलेला नाही.
भयानकसतत मुंबईत आगिच्याघटना घड़तायेत !
लोकऩी समजुतदाराने वागले पाहिजे नेहमी आग विझवणेचे उपकरण ठेवले पाहिजे कोणी हि आपले नुकसान भरुन देणार नाही आणि सरकार देईल हे विसरुन जा