
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मढ मार्केट बस थांब्याचा प्रश्न आणि कोळी महिलांच्या वातानुकुलीत बेस्ट बस मधून प्रवासाचा मुद्दा पालिका सभागृहात उपस्थित
कोळी महिलांना बेस्टच्या वातानुकुलीत बसमधून प्रवासाचा समान अधिकार देण्याची नगरसेविका संगीता कोळी यांची मागणी.
प्रभाग क्रमांक ४९ च्या नगरसेविका संगीता चंद्रकांत कोळी यांनी मुंबई महानगरपालिका सभागृहात नागरिकांच्या दोन महत्त्वाच्या समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावेळी मढ मार्केट येथील बस थांब्याचा प्रश्न उपस्थित केला . सहा महिने उलटले तरी या ठिकाणी अद्याप अधिकृत बस थांबा पूर्ववत करण्यात आलेला नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मढ मार्केट येथे आवश्यक सुविधा असलेला बस थांबा उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच कोळी समाजातील महिलांना मासळीच्या वासाचे कारण पुढे करून बेस्टच्या वातानुकूलित (एसी) बसमधून प्रवास करण्यास मज्जाव केला जात असल्याचा मुद्दाही त्यांनी प्रशासनासमोर मांडला. मासळी विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या कोळी महिलांना अशा प्रकारे प्रवासापासून रोखणे अन्यायकारक असल्याचे नमूद करत, त्यांना इतर प्रवाशांप्रमाणे समान प्रवासाचा अधिकार मिळावा आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये, अशी मागणी नगरसेविका संगीता कोळी यांनी केली.
या दोन्ही प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी पालिका सभागृहात केली.
Good thought