आठवडाभर फ्लॅश मॉब; नेहरूंच्या योगदानाबाबत जनजागृती.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : बालदिनाचे औचित्य साधून सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या सफल लर्निंग सेंटरमधील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी आठवडाभर विशेष फ्लॅश मॉब सादर करून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची आणि देशाच्या विकासातील योगदानाची जनजागृती केली.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. यानिमित्त १४ ते १८ नोव्हेंबरदरम्यान हा उपक्रम राबविण्यात आला. नृत्य आणि आकर्षक सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नेहरूजींचे विचार, शैक्षणिक धोरणे, सामाजिक योगदान आणि आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांनी बजावलेली भूमिका नागरिकांसमोर मांडली.

बालदिन केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता मुलांमध्ये देशाचा इतिहास, लोकशाही मूल्ये आणि महापुरुषांच्या कार्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. या सादरीकरणासाठी प्रशिक्षक मनोज परमार आणि इशिका जैस्वार यांनी विशेष मेहनत घेतली.

संपूर्ण आठवडाभर फ्लॅश मॉबच्या माध्यमातून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नागरिकांचा प्रतिसाद यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरल्याची माहिती संस्थेच्या सचिव वैशाली महाडिक यांनी दिली.


Share

2 thoughts on “आठवडाभर फ्लॅश मॉब; नेहरूंच्या योगदानाबाबत जनजागृती.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *