राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; १५ पदकांची कमाई

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

९ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांवर विद्यार्थ्यांनी उमटवली मोहोर

मुंबई : सांगली येथे २१ ते २३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत गोरेगाव पश्चिमेतील नूतन विद्यामंदिर महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकूण १५ पदकांची कमाई करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. यामध्ये ९ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

श्री लक्ष्य निवासी सैनिक पॅटर्न स्कूल, मणेराजुरी, गव्हाण रोड, सांगली येथे ही राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली.

पदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :

सुवर्णपदक विजेते – ९

* उर्वी चव्हाण – प्राथमिक विभाग

* खुशी कुळे – माध्यमिक विभाग

* मानसी निवाते – माध्यमिक विभाग

* लक्ष्मी सावंत – माध्यमिक विभाग

* मोहित भोसले – माध्यमिक विभाग

* अर्जुन कात्रट – माध्यमिक विभाग

* स्वप्नील कात्रट – माध्यमिक विभाग

* युवराज चव्हाण – माध्यमिक विभाग

* श्लोक ऐवळे – इंग्रजी माध्यम

रौप्यपदक विजेते – ३

* अक्षरा अहिरे – प्राथमिक विभाग

* नितीन लांबोरे – माध्यमिक विभाग

* दर्श रिकामे – माध्यमिक विभाग

कांस्यपदक विजेते – ३

* वेदांत धुर्ये – प्राथमिक विभाग

* दीक्षा नाईक – माध्यमिक विभाग

* श्लोक शिंदे – इंग्रजी माध्यम

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संदीप सावंत, माजी अध्यक्ष नितीन सावंत, उपाध्यक्ष शशिकांत दळवी, कोषाध्यक्ष उदय जोशी, सचिव अनिल देसाई, शंकर पटनायक सर, मुख्याध्यापक मसुरकर सर, मुख्याध्यापिका दीपाली राऊत, प्रिन्सिपल पूर्वा नाईक तसेच थाय बॉक्सिंग प्रशिक्षक गौरव अशोक पांचाळ यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशात प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे सहकार्य आणि पालकांचे प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले. या घवघवीत यशाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पालक आणि संस्थेचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


Share

2 thoughts on “राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत नूतन विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; १५ पदकांची कमाई”

  1. खुप सुन्दर सर्वाच मना पासून आभार आणि पुढे हि भरभरून यश प्राप्त हो हि ईश्वर चरणी प्रार्थना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *