एस एमएस -प्रतिनिधी.
६५० सभासदांच्या मागणीला अखेर यश; उपनिबंधकांचा महत्त्वपूर्ण आदेश
मुंबई : चारकोप, कांदिवली पश्चिम येथील विशाल सह्याद्री को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेल्या वादावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
सोसायटीच्या ६५० सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्याची मागणी केली होती. या मागण्यांकडे दुर्लक्ष करणे, पुनर्विकास प्रक्रियेतील कार्यपद्धती आणि सभासदांच्या हरकतींसंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यात आली.
या प्रकरणी उपनिबंधक, सहकारी संस्था, आर-दक्षिण विभाग, मुंबई यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७६(२) अन्वये दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश दिला. त्यानुसार सोसायटीचे अध्यक्ष, सचिव, खजिनदार तसेच सर्व समिती सदस्यांना दोन वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
हा निर्णय सभासदांच्या हक्कांच्या आणि सहकारी संस्थांमधील पारदर्शक कारभाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
सभासदांचा हक्क, न्याय आणि पारदर्शक कारभार यासाठीचा हा महत्त्वाचा टप्पा!
असकाय केल??