संविधानाच्या संरक्षणासाठी गोरेगावकर एकवटणार..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -कृष्णा वाघमारे.

मुंबई : भारतीय संविधानाने दिलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये जपण्यासाठी तसेच देशातील लोकशाही व्यवस्थेच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी गोरेगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात येणार आहे.

बाँबे कॅथलिक सभा आणि संविधान जागर यात्रा समिती, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रत्ना हॉटेल सिग्नल, एस. व्ही. रोड आणि एम. जी. रोड जंक्शन येथे सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत नमूद केलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये देशाच्या भाषिक, धार्मिक व सांस्कृतिक विविधतेला एकत्र बांधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत भारतीय संविधान आणि संवैधानिक लोकशाहीसमोर विविध आव्हाने उभी राहत असल्याची चिंता आयोजकांनी व्यक्त केली आहे.

अशा परिस्थितीत संविधानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी सामान्य जनतेने जागरूक राहणे गरजेचे असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. संविधानाचे संरक्षण ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे, तर प्रत्येक भारतीय नागरिकाची ऐतिहासिक जबाबदारी आहे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.

या संविधान दिन कार्यक्रमात गोरेगाव तसेच परिसरातील संविधानप्रेमी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, तसेच हे आवाहन मित्रपरिवारापर्यंत पोहोचवावे, असे आवाहन बाँबे कॅथलिक सभा आणि संविधान जागर यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Share

One thought on “संविधानाच्या संरक्षणासाठी गोरेगावकर एकवटणार..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *