
प्रतिनिधी :मिलन शाह
मुंबई,मंगल सागर गिरी व कल्याण कुंभार यांचे निलंबन आगार व्यवस्थापक यांनी मागे घेतले आहे.काँग्रेस सह अनेकांनी आगार व्यवस्थापक यांनी केलेल्या चुकीच्या कारवाईच्या विरोधात काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी सातत्यपूर्ण आवाज उठवला होता.
कळंब आगारातील महिला वाहक मंगल गिरी या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. आपल्या रिल्सच्या माध्यमातून त्या चांगल्याच लोकप्रिय झाल्या. मात्र, हे सर्व महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत दिनांक 1ऑक्टोबर रोजी त्यांना निलंबित करण्यात आले होते. यानंतर विविध स्तरातून यावर आक्षेप घेण्यात आला. अखेर वाढता दबाव पाहता हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. गिरी यांच्यावर झालेल्या कारवाईची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू झाली होती. अनेक राजकीय मंडळींनी सुध्दा यावर ट्वीट करून निलंबन मागे घ्यावे अशी मागणी केली होती.