जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, शंकर दरेकर यांचे प्रतिपादन.

Share

प्रतिनिधी :मुंबई,
जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही, न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा असाच सुरू राहील अशी
माहिती राष्ट्रीय किसान मजदुर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शंकर दरेकर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेत दिली. ते पुढे म्हणाले सरसकट कर्जमाफी द्यावी.कांदा, द्राक्ष, आंबा, काजू व इतर शेतमाल निर्यात धोरण स्पष्ट करावे अन्यथा खरेदीची आम्ही द्यावी. अशा विविध मागण्या त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषदेत सांगितल्या. यावेळी त्यांच्यासोबत नितीन थोरात, संदीप पाटील, कमल सावंत, एस बी पाटील, मकरंद जुनावणे, आबासाहेब जाधव, युवराज सूर्यवंशी, आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *