राष्ट्रचेतना अभियानाची स्वातंत्र्यदिनी मुंबईत सांगता

Share

प्रतिनिधी :वैशाली महाडिक

जि.जि.पारिख, मधुकर भावे,
नरेंद्र वाबळे, शरद कदम यांची उपस्थिती

मुंबई (प्रतिनिधी) : भारतातीय संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय प्रतिकांचा इतिहास आणि महत्त्व समाजात रुजविण्यासाठी विवेकी वारकरी संघटनांनी पंढरपूर येथून सुरू केलेल्या संविधान समता दिंडी आयोजित राष्ट्रचेतना अभियानाचा सांगता सोहळा मंगळवार, दि. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी मुंबईत होत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात होणा-या या सांगता सोहळ्याला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जि. जि. पारिख, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शरद कदम उपस्थितीत राहणार आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यांच्या त्यागातून स्वतंत्र झालेल्या देशाने अत्यल्प काळात आपले संविधान तयार केले. राष्ट्रध्वज म्हणून तिरंगा झेंडा स्विकारला, राष्ट्रगीत म्हणून जन गण मन हे गीत स्वीकारले, इतर काही राष्ट्रीय प्रतिके स्विकारली. मात्र ज्या शक्तींचा स्वातंत्र्य संग्रामात आणि या प्रतिकांच्या निर्मितीत काहींच सहभाग नव्हता असे लोक स्वातंत्र्यदिनापासून ते राष्ट्रध्वज, राष्ट्रगीयापर्यंत सर्वच गोष्टी बद्दल नकारात्मक बोलत आहेत. हे लक्षात आल्यानंतर या राष्ट्रीय प्रतिकांचे महत्व, इतिहास लोकांपर्यंत पोहचविण्याची संकल्पना संविधान समता दिंडीचे संचालक ह.भ.प. शामसुदर महाराज सोन्नर यांनी मांडली. संयोजक म्हणून त्याची जबाबदारी ह.भ.प. भारत घोगरे गुरुजी यांनी स्वीकारली. पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती ह.भ.प. भारत महाराज जाधव, देवराम महाराज कोठारे, धर्मकिर्ती महाराज परभणीकर, समाधान महाराज देशमुख, दादा महाराज पनवेलकर, मधुकर महाराज बारुळकर, ज्ञानेश्वर महाराज बंडगर आदी वेगवेगळ्या वारकरी संस्था, फड, संघटनांच्या प्रमुखांनी यात सहभाग घेतला. या अभियानाची सुरुवात पंढरपूर येथून 1 ऑगस्ट रोजी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज बापूसाहेब देहूकर, दिंडीकरी, फडकरी समाजाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थितीत झाली. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट महाराष्ट्राच्या गावा गावात हे अभियान सुरू होते. कीर्तन, प्रवचन, व्याख्यान या माध्यमातून लोक जागृती करण्यात आली.
या राष्ट्रचेतना अभियानाचा सांगतासोहळा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मुंबई मराठी पत्रकार संघ, आझाद मैदान मुंबई येथे दुपारी 2.00 वाजता होणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे भूषविणार आहेत. तर प्रमुख मार्गदर्शन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जि. जि. पारिख, मधुकर भावे करणार आहेत. यावेळी शरद कदम, दादा महाराज पनवेलकर, ज्येष्ठ कवी रमेश आव्हाड, धर्मकिर्ती महाराज परभणीकर, दादा महाराज पनवेलकर, देवराम महाराज कोठारे, भारत महाराज घोगरे गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती संविधान समता दिंडीचे संचालक ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.


Share

One thought on “राष्ट्रचेतना अभियानाची स्वातंत्र्यदिनी मुंबईत सांगता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *