प्रतिनिधी:सुरेश बोर्ले
मुंबई :भाजपाने आपली इभ्रत आज घालवली.मराठी माणसाला आज विनाकारण हिंदी भाषा त्यांच्या पाल्यास पहिली पासुन सक्ती करण्याचा प्रयत्न केला.परंतु मनसे नेते मा.राज ठाकरे ज्यांनी ह्या जीआर. विरोधात मराठी जनतेला व ईतर पक्षांना आवाहन केल्यावर, मुंबईच्या चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढायचा इषारा सरकारला दिला होता आणि त्यांच्या ह्या कृतीत अनेक पक्षांनी आपला सहभाग घेण्याचा विडाच उचलला.त्यामुळे शेवटी सरकारला नमाव लागलं व प्रेरित होणारे दोन्ही जी आर. रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला.येथे मराठी भाषेचा, मराठी माणसाचा मोठा विजय तर झालाच आहे.पण भाजपा हा पक्ष महाराष्ट्रात उताणा पडला.ह्या पक्षाची मुंबई व महाराष्ट्र मराठी माणसाकडंन तोडण्याचा मनसुबा उधळण्यात आला.नागपूकरांचा जी आर.रद्द केल्याचे भाषण करतानाचा चेहरा पाहण्यासारखा होता.तो रुबाब व चेहऱ्यावरचे भाव सांगत होते की मराठी माणसाच्या अस्मितेशी खेळल्या वर!काय परिस्थिती होते.अशीच एकजूट ज्या ज्या वेळेस,मराठी अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न होईल,त्यावेळेस अशीच एकजूट राखण्याचे आवाहन सगळ्या मराठी जनतेला आहे, अश्यावेळी आपला पक्ष बाजूला ठेऊन अस्मितेची लढाई लढायची आहे,ही लक्षात ठेवा! सत्ता धाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजेत की मराठी जनतेला ह्या महाराष्ट्रात भाषेसाठी मोर्चा काढावा लागतो.भाजपा ही महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे.येत्या निवडणुकीत, तूमच मत गुपित द्या!पण कमल ताईला दिलत तर बरबादी आहेच.पण मग बहिणींची ओवाळणी ही अनेक कर रूपाने वसुली होणार हिंदुत्वाच्या नावाने तुमचा गळा कापणार. हे लक्षात असूद्या. जय हिंद!जय महाराष्ट्र!
जय जय महाराष्ट्र माझा…