प्रतिनिधी : सुरेश बोर्ले
मुंबई : दादार येथे कबुतरखाना खुला करावा त्याविरुद्ध जैन समाजातर्फे अचानक आंदोलन करून संपूर्ण विभाग हा अडवून ठेवण्यात आला.संपूर्ण विभाग हा जाम झाला,वाहतूक ठप्प झाली, लोकांची रहदारी अडचणीत आली.असे आंदोलन किंवा मोर्चा इतर राजकीय पक्षाने काढला असता,तर वर्तमान सरकारने त्वरित मोठी पोलिस कुमक महिला पोलिस कुमक मागवून ताबडतोब आंदोलनकारानची धरपकड करून लाठीहल्ला करून,त्यांच्यावरअनेक भारतीय संविधान कलमे लावली असती व ते आंदोलन किंवा मोर्चा चेपण्यचा प्रयत्न नक्कीच केला असता. साधा कोणी केक तलवारीने कापल्यास किंवा हवेत गोळीबार केल्यास,ताबडतोब पोलिसी कारवाई होते.तर सामान्य माणसाच्या घरी नारळ फोडायचा कोयता सापडला तरी!
पोलिसी कारवाई होते.वास्तविक सांगायचे झाल्यास,ह्या जैन आंदोलकांनी हातात चाकूसुऱ्या ब्लेड व इतर धारदार शस्त्र कबूतर खान्यावरचे आच्छादन फाडण्यासाठी वापरले.त्याचे काय?हीच शस्त्रे चुकून अथवा रागाने कुणाला लागली असती!तर काय घडले असते.सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे,ह्या समाजाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच उल्लंघन केलेले आहे. त्याचे काय?हे इतरांनी केले असते तर? सरकारने कारवाईचास बडगा उभारला असता.मीरा रोड येथील मराठी मोर्चा अडवता त्यांना परवानगी नाकारता,अशावेळी मराठी बाबत भूमिपुरांवरती त्वरित कारवाई होते.फडणवीस साहिबा अजब तुझे सरकार? परजातीला, परप्रांतियांना स्वतःचा न्याय व भूमिपुत्रांना कायद्याचा न्याय! मा.मुख्यमंत्रीजी आपण मतांसाठी कटोरा घेऊन किती लोटांगण परप्रांतीयांकडे घालाल.त्याला कांहीं मर्यादा आहेत की नाही?आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, मराठी आहोत ह्या अस्मितेची तरी तुम्हाला जाणीव आहे की नाही.दुसऱ्या कोणाचे मोर्चा आंदोलन असते,तर दादरला पोलिसी छावणीचे रूप दिसले असते. कितीतरी पोलिस फाटा बारीगेट्स,बंदुकधारी कमांडो, अश्रुधुर नळकांड्या,हातात दंडुके व लोखंडी जाळ्या शिरस्त्राण घातलेल्या पोलिसांचा लाठीहल्ला.मग जेल भरो आंदोलन! वगैरे असा देखावा आपण केला असता.पण ह्या आंदोलनात अशी काही तयारी दिसलीच नाही.भाजपाने तर ही खेळी केली नाही ना? असा संशय आम जनतेला येतोय. परप्रांतीयांच्या मतांसाठी लाळघोटताना,तुम्ही भूमिपुतरांवर अन्याय करताय! हे तुम्हाला येथेच येणाऱ्या काळात फेडावे लागेल.कारण “कर तस भर”हा निसर्गाचा नियम आहे. हे तुम्हाला विसरून चालणार नाही.फक्त निवडणुकीत बॅलेट पेपर पद्धत तुम्ही ई. व्हि एम मशीनच्या जागी वापरा.दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल. महाराष्ट्रात भाजपा हिंदुत्वाच्या नावाखाली मराठी माणसाला!ह्या भूमिपुत्राला वेठीस धरतेय?याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल.आपले आता बागडे हिंदुत्ववादी प्रेम महाराष्ट्रासाठी बंद करा आणि भूमिपुत्रांसाठी काहीतरी करा?आपण जेवढा अत्याचार ह्या भूमिपुरांवर कराल!तेवढी जोरात क्रांती होईल. ही काळ्या पाटीवरची रेघ आहे.कारण अती अत्याचार, तेवढीच मोठी क्रांती हा जगाचा व निसर्गाचा नियम आहे.
Administration should act according to the law of the land irrespective of favouring