
प्रतिनिधी : उत्कर्ष बोर्ले
मुंबई: विलेपार्ले येथील इंदुलकर चाळीतील भागोजी पास्टे मागील शंभर हून अधीक वर्षांपासून शाडू मातीच्या गणपती मूर्तीची स्थापना करीत आहेत. हीच परंपरा सद्या त्यांच्या चौथ्या पिढीने सुरु ठेवली आहें.
भागोजी पास्टे स्वातंत्र्य पुर्व काळात उदरनिर्वाह साठी मुंबईत आले आणि त्यांनी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली तेव्हापासून चालत आलेला गणेशोत्सवाला जवळपास 100 हून अधिक वर्ष झालेली आहेत.
पहिल्यापासून शाडूच्या मूर्ती घरी आणून त्याची स्थापना करत असल्याने हे समाजा पुढे पर्यावरणा च्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट उदाहरण समोर ठेवले आहें..
आज पास्टे परिवारातील चौथी पिढी हा गणेशोत्सव पुर्वजांनी चालू केलेल्या पारंपरिक पद्धतीत त्याच उत्साहात आजही साजरा करत आहे.सोबत पर्यावरण पूरक मूर्तीचा गणपती ची स्थापना करून पर्यावरण रक्षण व धर्माची सांगड उत्कृष्ट पणे घातली आहे.
खूपच स्तुत्या यांचे अनुसरण करायल हवे
Greattt
यांचे अनुसरण सर्वांनी करायला हवे
स्तुत्य उपक्रम
Good