BJP महिला पदाधिकाऱ्याला फोनवरून अश्लील शिवीगाळ; जीवे मारण्याची धमकी

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

दिंडोशी पोलिसांत गुन्हा दाखल; भाजप चे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांचेही नाव चर्चेत

मुंबई : उत्तर मुंबई भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष मंजू अशोक तिवारी यांना फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून दिंडोशी पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांचाही उल्लेख असून, तक्रारदाराने त्यांच्या सहभागाबाबत आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, १७  रोजी दुपारी ४.४७ वाजण्याच्या सुमारास मंजू तिवारी आणि माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांच्यात फोनवर संभाषण झाले. या संभाषणादरम्यान एका टिप्पणीवरून वाद निर्माण झाला. संबंधित टिप्पणीवर तिवारी यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद अधिक वाढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, त्यानंतर एका व्यक्तीने मिश्रा यांच्या हातातून फोन घेत तिवारी यांच्याशी संवाद साधला. या वेळी त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली. त्याला विरोध केल्यानंतर अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मंजू तिवारी यांनी केला आहे.

या घटनेनंतर तिवारी  त्यानंतर त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीत,सुधारित  विनोद मिश्रा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास काय होईल आणि संभाषणाचे ध्वनिमुद्रण उपलब्ध आहे का, अशी विचारणा केल्याचाही उल्लेख आहे.

 पोलिसांनी  गुन्हा नोंदविल्याचे सांगण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक नागनाथ विठ्ठलराव काळबंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. फोनवरील संभाषण, कथित धमक्या आणि तक्रारीतील आरोपांची पडताळणी तपासादरम्यान केली जाणार आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *