एसएमएस -प्रतिनिधी.
मुंबई : राज्यभरात शेकडो कोटी रुपयांचा ड्रग्ज साठा जप्त केला जात आहे. यावरून राज्याची वाटचाल मेक्सिकोच्या दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट होते. ड्रग्ज माफियांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होत असली, तरीही त्यांच्यावर अपेक्षित जरब बसताना दिसत नाही. त्यामुळे या निर्ढावलेल्या ड्रग्ज माफियांची संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली.
अमली पदार्थांच्या विक्री संदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नावर सुरू झालेल्या चर्चेत सहभागी होत त्यांनी ही मागणी केली.
यावर उत्तर देताना, ‘मकोका’ अंतर्गतच ड्रग्ज माफियांची संपत्ती जप्त करण्याची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिली.
Great but should happen
खूप छान पण कृती हवी
Good it should start from Malwani Malad