
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : जनसंवाद संस्था, बोरीवली (पूर्व) यांच्या वतीने राजेंद्र नगर येथील जिजाई ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये चित्रकला स्पर्धा व शालेय साहित्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. टाटा समूहाच्या एचआर टीमनेही या उपक्रमात सहभाग घेतला.
परिसरातील ४० गरीब व गरजू मुलांनी चित्रकला स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेनंतर मुलांना चित्रकला बुक, पेन-पेन्सिल सेट, चॉकलेट व शाळेच्या बॅगचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पूनम शिंदे, सचिव अविनाश पवार, सुनीता धोत्रे, नंदा तलवटकर, मुस्कान मॅम, अनया घोडके, गायत्री टपाल आदी उपस्थित होते. पूनम शिंदे यांच्या हस्ते टाटा एचआर टीमच्या पूनम गौर व सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
“मुलांच्या शिक्षणासाठी संस्था नेहमीच कार्यरत राहील,” असे पूनम शिंदे यांनी सांगितले. टाटा एचआर टीमनेही भविष्यात अशा उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
Very good