एस.व्ही.रोडवर झाड कोसळले; काही काळ वाहतूक ठप्प..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मालाड, ता. ११ (बातमीदार): गोरेगाव पश्चिमेतील स्वामी विवेकानंद रोड, अर्थात एस.व्ही. रोडवर पाटकर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे झाड कोसळल्याने मंगळवारी काही काळ वाहतूक कोंडी झाली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच झाड कोसळल्याने त्याचा काही भाग रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश करताना अडचणींचा सामना करावा लागला. पादचाऱ्यांनाही काही काळ रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागला.
घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी रस्त्यावर कोसळलेले झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना दिलासा मिळाला.


Share

One thought on “एस.व्ही.रोडवर झाड कोसळले; काही काळ वाहतूक ठप्प..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *