क्रिएशन कराओके फॅमिली चा १३वा वर्धापन दिन थाटात साजरा!

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोर्ले

मुंबई : गोरेगाव येथील प्रज्ञा बोधिनी शाळेत स्थापन झालेल्या क्रिएशन कराओके फॅमिली ग्रुपचा १३ वा वर्धापन दिन उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. गुरुवर्य परुळेकर सरांनी छोटूभाई सरांच्या सहकार्याने १३ वर्षांपूर्वी या क्लबची स्थापना केली होती.
परुळेकर सरांची कडक शिस्त आणि अचूक गाण्याची शिकवण यामुळे या क्लबने अल्पावधीतच उपनगरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्या काळात उपनगरात कराओके प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्याने मुंबई शहर ते नवी मुंबईपर्यंतचे अनेक संगीतप्रेमी येथे गाण्याचे धडे घेण्यासाठी येऊ लागले. आजपर्यंत ३०० हून अधिक जणांनी येथे गायनाची तालीम घेतली असून, शास्त्रीय संगीतासाठी पंडित गद्रे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. या क्लबमधून तयार झालेले अनेक गायक आज विविध मंचांवर उत्कृष्ट सादरीकरण करताना दिसतात.
सध्या या क्लबची धुरा संगीत क्षेत्रात नावलौकिक असलेले मा. निलेश माळी सर यशस्वीपणे सांभाळत असून, ते नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत.
१३ व्या वर्धापन दिनानिमित्त परुळेकर सर आणि छोटूभाई सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आजी-माजी गायकांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
प्रज्ञा बोधिनी शाळेत पार पडलेल्या या कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कार्यक्रमात विविध गायकांनी सुरेल गाणी सादर करत वातावरण रंगतदार केले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिकच शोभा प्राप्त झाली.


Share

One thought on “क्रिएशन कराओके फॅमिली चा १३वा वर्धापन दिन थाटात साजरा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *