गतिरोधकावरील पट्ट्यांचे रंग उडाले; रेडियम लावण्याची मागणी.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : मालाड येथील मार्वे रोडवर काही महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेल्या गतिरोधकांवरील सफेद पट्ट्यांचे रंग पूर्णपणे उडाल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. झेब्रा क्रॉसिंगवरील पट्टे स्पष्ट दिसत नसल्याने लांबून वेगाने येणाऱ्या वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
रात्रीच्या वेळी किंवा भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांना अचानक गतिरोधक समोर आल्याने चालकांना तातडीने ब्रेक लावावे लागत आहेत. त्यामुळे वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
काही महिन्यांतच सफेद पट्ट्यांचा रंग उडाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबतही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पालिकेने तातडीने या गतिरोधकांवरील सफेद पट्टे नव्याने रंगवावेत तसेच रात्री स्पष्ट दिसण्यासाठी रेडियम स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि रहिवाशांकडून करण्यात येत आहे. रेडियम बसवल्यास दूरवरूनच वाहनचालकांना गतिरोधकांची कल्पना येऊन वेग कमी करण्यास मदत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.


Share

One thought on “गतिरोधकावरील पट्ट्यांचे रंग उडाले; रेडियम लावण्याची मागणी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *