गोरेगावात ‘रंग-नाद’तर्फे ‘प्रश्नोपनिषद’ चे २४ ला सादरीकरण

Share

एसएमएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक

लेखक अरविंद निगळे; दिग्दर्शन संजीव पंडित यांचे

मुंबई : ‘रंग-नाद’तर्फे ‘प्रश्नोपनिषद’ या मराठी दीर्घांकाचे सादरीकरण शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६ रोजी गोरेगाव पूर्व येथे आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत होणारा हा कार्यक्रम डॉ. भानुबेन नाणावटी कलाघर, नंदादीप हायस्कूल, जयप्रकाश नगर, गोरेगाव (पूर्व), मुंबई-६३ येथे पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी देणगीमूल्य २०० रुपये ठेवण्यात आले आहे.

या दीर्घांकाचे लेखन अरविंद निगळे यांनी केले असून, दिग्दर्शनाची जबाबदारी संजीव पंडित यांनी सांभाळली आहे. नेपथ्य विनायक सातपुते, संगीत मेरिक कुटिन्हो, वेशभूषा डॉ. मेघना जोशी आणि प्रकाशयोजना कुणाल शिरोडकर यांची आहे.

या नाट्यप्रयोगात डॉ. नीलिमा व डॉ. अरुण आपटे, प्रवीण वनवे, श्वेता आडेलकर, डॉ. मेघना जोशी, डॉ. अनुया बडवे, श्रुती काळे, निखिल मोगरे, डॉ. नितीन कोचर, केतन सावंत, अरविंद निगळे आणि बालकलाकार सोहम वाणी सहभागी होणार आहेत.

मराठी रंगभूमीवरील या दीर्घांकाच्या सादरीकरणाला नाट्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

कार्यक्रमाची माहिती

  • नाटक: प्रश्नोपनिषद
  • प्रकार: मराठी दीर्घांक
  • दिनांक: शनिवार, २४ ऑक्टोबर २०२६
  • वेळ: सायंकाळी ६ ते ८
  • स्थळ: डॉ. भानुबेन नाणावटी कलाघर, नंदादीप हायस्कूल, जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व, मुंबई-६३
  • देणगीमूल्य: ₹२००


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *