बिल्डर च्या मनमानीविरोधात रहिवाशांचा संताप..

Share

एसएम एस-प्रतिनिधी -सुरेश बोरले

मुंबई : विलेपार्ले पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील मोकळ्या जागेवर विकासकाकडून करण्यात येत असलेल्या कथित मनमानी कारभाराविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
माहितीनुसार, २८ एप्रिल रोजी काही व्यक्ती अचानक संबंधित जागेवर दाखल झाल्या आणि विकासकाच्या मूळ सीमारेषेपेक्षा सुमारे ६ ते ७ फूट पुढे, रस्त्यावर तसेच गटाराच्या वरील भागात तीन मोठे खड्डे खोदण्यात आले. त्यानंतर विकासक त्या ठिकाणी लोखंडी पत्रे उभारून सीमा निश्चित करण्याच्या तयारीत होता.
ही बाब लक्षात येताच समोरील दुर्वांकुर सोसायटीसह परिसरातील रहिवाशांनी एकत्र येत या प्रकाराला तीव्र विरोध केला. रहिवाशांच्या आक्रमक भूमिकेनंतर संबंधित के/पूर्व विभागाच्या महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खड्डे खोदण्याचे काम तात्पुरते बंद करण्यात आले.
तथापि, काही दिवसांनी पुन्हा विकासकाकडून काम सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पुन्हा एकत्र येत विरोध नोंदविला. याच पार्श्वभूमीवर दिनांक ७ मे रोजी दुर्वांकुर सोसायटीच्या पुढाकाराने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत दुर्वांकुर सोसायटीसह आजूबाजूच्या विविध इमारतींतील रहिवासी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत स्वाक्षऱ्या करून विकासकाच्या कारभाराविरोधात निषेध व्यक्त केला. स्थानिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ते व गटार क्षेत्रावरील अतिक्रमण रोखावे, अशी मागणी केली आहे.


Share

One thought on “बिल्डर च्या मनमानीविरोधात रहिवाशांचा संताप..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *