
ठाणे-मुलुंड आणि कांजूरमार्ग-भांडुपदरम्यान वाहतूक विस्कळीत; जलद व धीम्या मार्गावरील गाड्या विलंबाने
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सोमवारी (ता. २६) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. ठाणे-मुलुंड आणि कांजूरमार्ग-भांडुप स्थानकांदरम्यान हा बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वे नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
या बिघाडाचा परिणाम अप आणि डाऊन दिशेच्या जलद तसेच धीम्या मार्गावरील लोकल सेवांवर झाला आहे. त्यामुळे लोकल गाड्या कमी वेगाने चालवण्यात येत असून, प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.
फार चुकिची गोष्ट आहे पण खर तर यात जनतेचे फार हाल होतात सरकार ने लक्ष दिले पाहिजे