मध्य रेल्वे स्थानीय लोकाधिकार सेनेच्या कार्याध्यक्षपदी भाई आंग्रे..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई :रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेले संजय (भाई) आंग्रे यांची सेंट्रल रेल्वे स्थानीय लोकाधिकार सेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

नियुक्तीनंतर भाई आंग्रे यांनी संघटनेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, कर्मचारी-अधिकारी समन्वय वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळावी यासाठी कटिबद्धपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या पदाधिकारी व रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


Share

One thought on “मध्य रेल्वे स्थानीय लोकाधिकार सेनेच्या कार्याध्यक्षपदी भाई आंग्रे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *