
एसएसएम -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई :मालाड पश्चिमेतील गेट क्रमांक ३ येथे संपूर्ण वस्तीतील गटारातील उपासलेले गाळ मागील १५ हुन अधीक दिवसापासून पडून आहे या बाबत पालिके तसेच स्थानिक नगरसेवक यांचे प्रतिनिधीन्ना रहिवाशांनी अनेक वेळी गाळ उचलण्याची विनंती ही केली मात्र त्यांच्या कडून काहीच झालेले नसल्याने हा गाळ संपूर्ण सुखून गेल्याने हवेने उडून रहिवाशांच्या घरात आणि परिसरातील दुकानात जात आहे. त्यामुळे रहिवाशांची प्रचंड गैर सोय होत आहे.तसेच उपसलेल्या गाळाचा हा डोंगर ७ ते ८ फुटाचा झाला असल्याने अर्ध्याहून अधीक रस्ता भरल्याने पादचाऱ्यांची गैर सोय होत असून दुचाकी, ऑटो अथवा दुसऱ्या कोणत्या ही वाहणांचे ये जा बंद झाल्याने रुग्ण वाहिका ही येवू शकत नसल्याने नागरिक चिंतेत व हतबल झालेले आहेत. त्यांनी पालिका पी उत्तर विभागीय सहाय्यक आयुक्तांना या समस्ये कडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.