मालवणीत कचऱ्याचा ढिगारा; नागरिक त्रस्त.

Share

एसएमएस.-प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई :मालाड पश्चिमेतील मालवणी गेट क्रमांक ६, गावदेवी मंदिर परिसरातील जुलीयस वाडी येथे एका खासगी शाळेजवळील कचरा कुंडी तुडुंब भरून कचरा रस्त्यावर पसरल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून या कचरा कुंडीच्या स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कचरा कुंडी भरून वाहत असल्याने कचरा थेट रस्त्यावर पसरला असून नागरिकांना कचऱ्यातून वाट काढत ये-जा करावी लागत आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाणही वाढल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

पालिकेने तातडीने परिसराची स्वच्छता करून नियमित कचरा उचलावा तसेच धूर फवारणी करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी श्रीकांत कांबळे यांनी केली आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *