
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले
मुंबई : मालाड रेल्वे स्थानकातील फ्लाट क्रमांक एक वर छत नसल्याने प्रवाशांची गैर सोय होत आहे. मागील दोन वर्षांपासून नवीन व्यवस्थेनुसार प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी तसेच त्यांची सोय होण्यासाठी लोखंडी फ्लाट बनवण्यात आले मात्र दोन वर्षे होत आले तरी या फ्लाट वर छत नसल्याने नागरिकांची प्रचंड गैर सोय होत आहे. तसेच भर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात भिजत भिजत लोकल ची वाट पहावी लागते तसेच भिजल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असुन लोकल पकडताना हात निसटून दुर्घटनेची भीती वर्तवली जात आहे. काही दिवसापूर्वी मनसे च्या वतीने फ्लाटावर छत लावण्यासाठी निदर्शने पण करण्यात आली होती.मात्र प्रशासनाने दहा दिवसात छत लावण्याचे आश्वासन दिले होते मात्र दहा हुन अधीक दिवस झाले तरी काहीच कारवाई झालेली नाही.
Mumbaikars are not needed only tax theywant cant they putup temporary shed?