मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधात कांग्रेस चे आंदोलन.

Share

एसएमएस -प्रतिनिधी – उत्कर्ष बोरले


मुंबई, : लोकसभा में विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी २४ सप्टेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. ‘वोट चोरी’ तसेच मतदार यादीतील विशेष सखोल पुनरावलोकनाबाबत काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांच्या निर्देशानुसार आणि आमदार अस्लम शेख यांच्या उपस्थितीत उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३० वाजता बोरीवली पूर्व रेल्वे स्थानकासमोर कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या कामकाजाची निष्पक्ष चौकशी, आवश्यक कायदेशीर कारवाई आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
मुंबई काँग्रेस व उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, महिला काँग्रेस, सेवा दल, युवक काँग्रेस, NSUI तसेच विविध विभाग व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजपति यादव यांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *