राजू गायकवाड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार.

Share

एसएएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.

मुंबई : महानगरपालिकेच्या कुर्ला ‘एल’ विभागांतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागात कनिष्ठ पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले राजू आनंदीबाई पांडुरंग गायकवाड हे तब्बल ३२ वर्षे ६ महिन्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.
त्यांच्या उल्लेखनीय सेवाकार्याचा गौरव करण्यासाठी फाईन आर्ट सोसायटी सभागृहात त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गायकवाड यांच्या सेवाभावी वृत्ती, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि सहकाऱ्यांशी जपलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा गौरव करत त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभास महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share

One thought on “राजू गायकवाड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *