संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारातच पाणी..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : सद्या मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे उद्यानात फेरफटका मारण्यासाठी, जॉगिंगसाठी तसेच पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रवेश शुल्क भरूनही साचलेल्या पाण्यातूनच उद्यानात प्रवेश करावा लागत आहे.

देश-विदेशातून मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांनाही याच पाण्यातून प्रवेश करावा लागत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईची ओळख देशाची आर्थिक राजधानी म्हणून असताना, शहरातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळाच्या प्रवेशद्वाराची अशी अवस्था पाहून शहराच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना अनेक पर्यटकांनी व्यक्त केली.

‘मुंबईचे फुफ्फुस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच पाणी साचत असेल, तर संबंधित यंत्रणांनी पावसाळ्यापूर्वी आवश्यक नियोजन केले होते का, असा सवालही पर्यटकांनी उपस्थित केला आहे.

साचलेल्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि वन विभागाने संयुक्तपणे उपाययोजना करून प्रवेशद्वारावरील जलनिस्सारण व्यवस्था सुधारावी, अशी मागणी पर्यटक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.


Share

One thought on “संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारातच पाणी..

  1. पर्यटकांना नाहक त्रास, हेच का मोदी सरकारचे अच्छे.
    दिन!
    याच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दररोज येणाऱ्या हजारो पर्यटकांकडून लाखो रुपये वसूल केले जातात.तसेच त्यामागे करही वसूल केला जातो.परंतु याच कुचकामी महापालिका अधिकाऱ्यांनी येथे येणाऱ्या पर्यटकांच्या गैर सोईकडे मुद्दामून डोळेझाक केल्याचे सदरच्या चित्रात पहिल्याअंती स्पष्ट झाले.त्यामुळे नागरिकांच्या कर रूपातून मिळणारे लाखो,कोट्यवधी रुपये जातात कुठे, खर्च करून देखील पर्यटकांना अशा गैरसोईचा सामना करावा लागतो ही एक लज्जास्पद बाब म्हणावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *