सीजेपीच्या आंदोलनाला मोठे यश, धर्मेंद्र प्रधानांचा विकेट..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे NEETसह विविध स्पर्धा परीक्षांच्या कथित पेपरफुटी प्रकरणाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा सीजेपी (CJP) कार्यकर्त्यांनी केला आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून केंद्र सरकारवरही मोठा दबाव आला.
आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमारानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले. त्यानंतर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली. कोणतीही तडजोड न करता राजीनाम्याच्या मुद्द्यावर ठाम राहिल्याचा दावा आंदोलनाच्या शिष्टमंडळाने केला आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सोनम वांगचुक यांच्या उपोषणासह अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला. या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना पद सोडावे लागल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला असून, त्यांनी याला विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत, परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करणे आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी पुन्हा एकदा केली.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *