
एसएमएस -प्रतिनिधी -मिलन शहा
मुंबई, चारकोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभाग क्रमांक २ तर्फे चारकोप येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवणी महोत्सवाला शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भेट देऊन महोत्सवातील पाली बल्लाळेश्वर मंदिरात दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी नागरिक आणि उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला.
कार्यक्रमादरम्यान परिसरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ठाकरे यांच्या भेटीमुळे महोत्सवाला विशेष आकर्षण लाभले.
या वेळी विभागप्रमुख संतोष राणे, विभाग संघटक मनाली चौकीदार, माजी नगरसेविका शुभदा गुडेकर, उत्तर मुंबई समन्वयक कमलेश यादव, चारकोप विधानसभाप्रमुख राजू खान, मालाड विधानसभाप्रमुख कैलास कणसे, कांदिवली पूर्व विधानसभाप्रमुख संतोष धनावडे, शाखाप्रमुख निखील गुडेकर तसेच अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशा सभा होत राहु दया कार्यकरतेचे व जनतेचा विश्वास वाढेल
Great
Very good
Greatttt
Nice