
एसएमएस – प्रतिनिधी -सोमा बाबु डे.
मुंबई :मालाड मालवणीतील साने गुरुजी वसाहतीत पालिकेच्या अर्धवट व निकृष्ट कामामुळे नागरिकांची वाट बिकट झाली आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी पालिकेच्या रस्ते विभागामार्फत येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. मात्र या कामामुळे ब्लॉक क्रमांक २ आणि ३ तसेच ३ आणि ४ दरम्यानचा रस्ता असमतोल झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
रस्त्याची पातळी एक ते दीड फूट उंच झाल्याने ये-जा करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि गर्भवती महिलांना या उंच-सखल रस्त्यावरून चालताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गुडघ्यांच्या आजारांनी त्रस्त असलेल्या वृद्धांना तर घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
हा अंतर्गत रस्ता असला तरी परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागात चार खासगी दवाखाने, एक दंतचिकित्सक, दोन औषधांची दुकाने तसेच बेकरी आणि किराणा दुकाने असल्याने येथे दिवसभर नागरिकांची आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या असमतोल रस्त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून रुग्णांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून रस्ता समतल करावा व सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
या बाबत आम्ही पालिकेच्या पी उत्तर विभागात तक्रार केली आहे. तसेच कंत्राटदाराला ही या बाबत सांगितले नुसते आश्वासन दिले. काहीच कारवाई होत नाही. पावसाळ्यात आमच्या दारात आणि घरात पाणी शिरण्याची भीती आम्हाला वाटत आहे.-वैशाली पावसकर -ज्येष्ठ महिला नागरिक.
या असमतोल रस्त्यावरून ये जा करताना अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला तोल जाऊन पडल्या आहेत. दिनांक २२रोजी स्थानिक रहिवासी ज्येष्ठ नागरिक महिला नसीम शेख पडली व तिच्या डाव्या पायाला आणि उजव्या हाताला मार लागले आहे.-
Very Bad bmc