बी वॉर्ड येथे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले..

Share

एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

मुंबई : जेजे रुग्णालयासमोर असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या बी विभागातील प्रांगणात ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे. रुग्णालय समूह यांच्यातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सहभागी होत पालिका कर्मचाऱ्यांनी रक्तदानकरीत श्रेष्ठ दानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. बी विभागाचे सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अविनाश जोगदंड,दुय्यम अभियंता किरण आव्हाड यांनी रक्तदात्यांचे स्वागत करीत रक्तदान शिबिरात सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. रक्तदाते राहुल चोगले यांनी रक्तदान केल्याचा आनंद व्यक्त केला.

सहाय्यक आयुक्त जितेंद्र घोराडे यांनी उपस्थितांना रक्तदान करा,मानवी जीवन वाचवा,जनमाणसांत एक रक्तदाते नायक बना,दुसऱ्याचे अनमोल जीवन वाचविण्यास सहकार्य करा जीवनदाते बना,तुमचे रक्त दुसऱ्याच्या जीवनात एक आनंदमय बदल घडवू शकते, जीवनदानाचे दान वाटा असे आवाहन करीत विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वर्षातून निदान दोनदा रक्तदान करावे अशी विनंती तरुणाईला केली. अशी माहिती स्वीय लिपिक दिलीप सोसा यांनी दिली.


Share

One thought on “बी वॉर्ड येथे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *