मालाड मध्ये रिपाई (अ )तर्फे शालेय मुलांना वह्या वाटप…

Share

एसएमएस – प्रतिनिधी – सोमा डे.

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ.) तर्फे मालाड विधानसभा पश्चिम येथिल वार्ड क्र.47 मधिल लिबर्टी गार्डन येथे विश्वशांती बुद्धविहारात तसेच वार्ड क्र 49 मधिल मार्वे रोड आक्सा बिच जवळ धारवली गावातील आदिवासी पाड्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र कोषाध्यक्ष ॠषी माळी पुरस्कृत वहयांचे या दोन्ही वार्ड मधील भागात मालाड विधानसभा अध्यक्ष व बौद्धजन पंचायत समिती गट क्र.29 चे विश्वस्त गटप्रतिनिधी सुनिल गमरे यांनी शालेय मुलामुलींना वहया वाटप केल्या.या कार्यक्रमाला त्या त्या वार्ड मधिल पक्षाचे पदाधिकारी तसेच स्थानिक सामाजिक,धार्मिक संस्थानेही मोलाचे सहकार्य केले व सुनिल गमरे यांचे आभार मानले.सुनिल गमरे सोबत वार्ड क्र.47 चे वार्ड अध्यक्ष महेश कांबळे,माजी.अध्यक्ष मंगेश टोम्पे,बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.596 चे अध्यक्ष सुभाष सावंत,तसेच उपाध्यक्ष व पक्षाचे वरिष्ठ सल्लागार सुरेश कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे 47 चे माजी अध्यक्ष राजेश कांबळे,हि उपस्थित होते.तसेच संदिप कांबळे,अमित कांबळे,साहिल कांबळे,सुमित गमरे,मयुर लाखण,तेजल जाधव,रिध्दी गमरे,मोहिणी लाखण,गिता गमरे ई.लिबर्टी चे सभासद हजर होते,तसेच धारवली गावात सुनिल गमरे सोबत रिपाई मालाड संघटक सिद्धार्थ सहजराव, गावातील महिला पदाधिकारी सुनिता पासवान,अंजली बाबर,लक्ष्मी राऊत,नवनिता पाटिल,सुप्रिया शिरसेकर व काही सभासद ही उपस्थित होते.


Share

2 thoughts on “मालाड मध्ये रिपाई (अ )तर्फे शालेय मुलांना वह्या वाटप…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *