
एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.
मुंबई : मुसळधार पावसामुळे मालाड स्थानक पश्चिम परिसरातील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अचानक पाणी साचल्याने दुकानांतील साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी दुकानदारांची मोठी धावपळ उडाली.
दुकानात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी काही दुकानदारांनी पंपाचा वापर करून पाण्याचा उपसा केला. पावसाचे पाणी निचरा होण्यास विलंब होत असल्याने व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
दरवर्षी पावसाळ्यात या परिसरात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत असल्याने प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारावी, अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.