मृणालताई गोरे स्मृतिदिनानिमित्त ‘सहिष्णुता खरी की उपरी’ पुस्तकाचे प्रकाशन.

Share

एसएसएस -प्रतिनिधी -वैशाली महाडिक.

मुंबई : ज्येष्ठ दिवंगत समाजवादी विचारवंत आणि ज्येष्ठ नेत्या मृणालताई गोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘सहिष्णुता खरी की उपरी’ या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी गोरेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
केशव गोरे स्मारक ट्रस्ट आणि स्वाधार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात न्यायमूर्ती अभय ठिपसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. य. दि. फडके प्रगत संशोधन केंद्र आणि ललित पब्लिकेशन यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकाचे लेखन साहिल कबीर यांनी केले आहे.
या पुस्तकातून सहिष्णुता, सामाजिक मूल्ये आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. कार्यक्रम शुक्रवार, १७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती अभय ठिपसे उपस्थित राहतील. यावेळी ‘सोलोकोरस’ हा विशेष कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन साहिल कबीर यांनी केले असून, दिग्दर्शन राहुल जामखडे यांचे आहे.
कार्यक्रमास नागरिक, साहित्यप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केशव गोरे स्मारक ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त प्रमोद निगुडकर आणि स्वाधारच्या अध्यक्षा मंगला मराठे यांनी केले आहे.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *