पदपथावर लोखंडी मचाण पादचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर.

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मुंबई : मालाड पश्चिम रेल्वे स्थानकालगतच्या गजबजलेल्या रस्त्यावरील पदपथावर एका विकासकाने उभारलेल्या लोखंडी मचानीमुळे पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जसवंत जॅकपॉट बिल्डर यांनी पदपथावर ही लोखंडी मचाण उभारली असून ती धोकादायक असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

पदपथावर मचाण उभारण्यात आल्याने पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून ये-जा करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच मचाण उभारण्यासाठी रस्त्यावर लोखंडी खांब बसविण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी, सकाळी आणि संध्याकाळी मालाड रेल्वे स्थानकावर ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मचानीच्या परिसरात कोणतेही पुरेसे सुरक्षा उपाय करण्यात आलेले दिसत नाहीत. त्यामुळे मचाण कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी काही पादचाऱ्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा संतप्त सवालही स्थानिक नागरिक आणि पादचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.


Share

One thought on “पदपथावर लोखंडी मचाण पादचाऱ्यांची सुरक्षा ऐरणीवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *