गोरेगाव पूर्वेत बालगोपालांसाठी अभिनव ‘चॉकलेट हंडी’ सोहळा उत्साहात..

Share


एसएमएस -प्रतिनिधी -सुरेश बोरले.

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील जयप्रकाश उद्यानात ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या वतीने बालगोपालांसाठी अभिनव ‘चॉकलेट हंडी’ आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता झालेल्या या कार्यक्रमाला बालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दहीहंडी उत्सवाची परंपरा जपत बालगोपालांना आनंदाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. चॉकलेट हंडी फोडण्याचा आनंद घेताना बालकांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाचे संकल्पना, पूर्वनियोजन आणि प्रत्यक्ष आयोजन यशस्वी करण्यामध्ये श्री. गिरीष नाईक सर यांनी विशेष पुढाकार घेतला. कल्पकता, उत्साह आणि नियोजनाची सांगड घालत त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन कार्यक्रमाची आखणी केली. त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा सोहळा सुरेख आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
बालगोपालांसह उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले. निस्वार्थी भावनेतून बालकांना आनंदाचे क्षण देणाऱ्या गिरीष नाईक यांच्या प्रयत्नांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *