
एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले.
ठाणे, : चितलसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑन-ड्युटी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) भोईर यांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतिहासशीटर राजा वाल्मिकी याने ही हत्या केल्याचा आरोप असून, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, PSI भोईर हे कर्तव्यावर असताना ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी राजा वाल्मिकी याच्याबाबत अधिक माहिती तसेच हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून, अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच हत्येचे कारण आणि घटनेचा सविस्तर तपशील स्पष्ट होणार आहे.
या घटनेबाबत अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.