मालवणीतील जनकल्याण रस्त्यावर धोकादायक उघडे मॅनहोल

Share

एसएमएस -प्रतिनिधी -सोमा डे.

मालाड, ता. २८ (बातमीदार) : मालवणीतील जनकल्याण नगर रस्त्यावर लक्ष्मी पॅलेस इमारतीसमोर मॅनहोलचे झाकण तुटून पडल्याने ते धोकादायक बनले आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून मॅनहोल उघडे असून, या ठिकाणी अपघात होण्याची भीती वाहनचालक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी स्थानिकांनी मॅनहोलभोवती काठ्यांच्या सहाय्याने वाहनाचे जुने टायर लावून वाहनचालकांना धोक्याची सूचना देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी हे मॅनहोल अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे.
अनंत चतुर्दशीनिमित्त काही दिवसांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ते दुरुस्ती करण्यात आली. मात्र, दुरुस्तीचे काम करताना हे उघडे मॅनहोल संबंधित यंत्रणेला दिसले नाही का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या ठिकाणी तातडीने नवीन मॅनहोलचे झाकण बसवून संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.


Share

One thought on “मालवणीतील जनकल्याण रस्त्यावर धोकादायक उघडे मॅनहोल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *