एसएमएस -प्रतिनिधी -उत्कर्ष बोरले

नऊ दिवस दांडिया, गरबा रास, सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे आयोजन
मुंबई : नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘विलेपार्लेची राजमाता’ नवरात्रोत्सव मंडळाचा यंदाचा ३५वा वर्ष आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंडळाच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भक्तिभाव, उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीचा संगम साधत हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत दांडिया, गरबा रास आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते. देवीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. ‘विलेपार्लेची राजमाता’ ही नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांमध्ये विशेष श्रद्धेचे स्थान राखून आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीलाही मंडळाकडून महत्त्व दिले जाते. सार्वजनिक हिताचे विविध उपक्रम राबवून समाजाप्रती असलेले कर्तव्य पार पाडण्याचा मंडळाचा प्रयत्न असतो. यंदाच्या ३५व्या वर्षानिमित्तही नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळाच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे.
